तालुकास्तरीय व्हॅालिबॅाल स्पर्धेत समर्थच्या मुलींचा संघ प्रथम.

0
तालुकास्तरीय व्हॅालिबॅाल स्पर्धेत समर्थच्या मुलींचा संघ प्रथम.

उदगीर (प्रतिनिधी) तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुलींचा संघ तालुकास्तरीय व्हॅालिबॅाल स्पर्धेत १७ वर्ष वयोगटात प्रथम आला आहे.
उदगीर येथील मेथॅाडीस्ट इंग्लिश स्कुलच्या मैदानावर शुक्रवारी पार पडलेल्या तालुकास्तरीय व्हॅालिबॅाल स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात खेळताना वाढवणा बु. येथील कन्या विद्यालय व आनंदी पब्लिक स्कूल, उदगीर या संघाचा सरळ सेट मध्ये पराभव केल्याने मुलींचा संघ तालुक्यात प्रथम येवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या यशाबद्दल संस्थासचिव प्राचार्य प्रमोद चौधरी, पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, संस्थासदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, प्रयास चौधरी, प्रा. बी. एस. बाबळसुरे, रसूल पठाण, क्रिडा समन्वयक किरण हाळीघोंगडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!