विविध सामाजिक संघटनांच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.
उदगीर (प्रतिनिधी) नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्या दालनामध्ये अतिक्रमणाच्या विषयावर डॉक्टर आणि पत्रकार यांची बैठक पार पडली. त्या बैठकीत माजी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर ते बाहेर आले आणि मानव अधिकार कार्यकर्ते तथा साप्ताहिक बहुजन अस्तित्वचे संपादक नितीन एकुरकेकर यांना उद्देशून बोलू लागले, त्या हॉस्पिटलच्या ठिकाणी बेड मी टाकले आहे. डीपी मी बसवली आहे. कुणाच्यात दम आहे, त्यांनी येऊन उठून दाखवावे, खतम करतो. अशी धमकी दिली. ही भाषा लोकप्रतिनिधीला शोभत नाही. ही आपली संस्कृती नाही. नितीन एकुरकेकर यांच्या जीवितास धोका असून विविध सामाजिक संघटनांच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी व उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन रीतसर तक्रार करण्यात आली आहे.
तात्काळ कारवाई करावी असे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी लोकनेते बापूसाहेब कांबळे, युवा भीमसेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रीतम भैया सूर्यवंशी, लष्कर ते भीमा संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशील मादळे, शहराध्यक्ष आशिष कोकणे, वैभव गायकवाड, विकी काळे, आदित्य गायकवाड, अभिजीत कांबळे, अविनाश गिलचे, बहुजन पँथर सेनेचे गौतम दादा सोमवंशी, युथ पॅंथर चे तालुकाध्यक्ष सुनील कांबळे, शहराध्यक्ष प्रतीक भैया कांबळे, शिवक्रांती बहुजन संघटनेचे तालुकाध्यक्ष आकाश माने, भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष आकाशभैया कस्तुरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
