उदगीर येथील क्रीडा संकुलास भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या.
उदगीर(एल पी उगीले) उदगीर शहरातील मध्यभागी असलेल्या जिल्हा परिषद मैदानाचे सध्या बांधकाम सुरू असून हे मैदान पूर्वी उदगीर शहरातील ऐतिहासिक असलेली जिल्हा परिषद शाळेचे मैदान म्हणून प्रसिद्ध होते. सदरील जागेवरील निजामकालीन बांधकाम असलेली जिल्हा परिषद शाळा पाडून या मैदानाला तालुका क्रीडा संकुल विभागास वर्ग करण्यात आले आहे. या क्रीडा संकुलाच्या विकासासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधी ही मंजूर केला आहे. या ऐतिहासिक मैदानाची उदगीरकर आठवण म्हणून या क्रीडा संकुलास भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे. यासाठी जनमानसात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. उदगीर शहरातील व परिसरातील आंबेडकर प्रेमी जनतेच्या भावना लक्षात घेऊन उदगीर येथील आंबेडकरवादी सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन उदगीर नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती गजानन सताळकर, माजी नगरसेवक मंजूर पठाण,माजी नगरसेवक मेहबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष अजीम दायमी,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सोनू (आदर्श) पिंपरे,धनाजी बनसोडे,प्रतीक कांबळे,भागवत तलवारे, अभिनव गायकवाड,प्रेम तोगरे यांनी उदगीर येथील क्रीडा संकुलास भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
