अहमदपूर उपविभागांतर्गत अवैध दारू विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई

0
अहमदपूर उपविभागांतर्गत अवैध दारू विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई

​अहमदपूर ( गोविंद काळे ) उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर उपविभागातील पोलीस ठाण्यांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत स्थानिक पोलीस ठाण्यांनी एकूण ६ गुन्हे दाखल करत ६ आरोपींना अटक केली आहे.

​याविषयी पोलीसांकडून मिळालेली माहीती अशी की,​अवैध देशी, विदेशी व हातभट्टी दारूच्या विक्रीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाच विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी अहमदपूर, किनगाव, वाढवणा आणि जळकोट या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी छापे टाकले.

​अहमदपूर पोलीस ठाणे: १ गुन्हा दाखल
​किनगाव पोलीस ठाणे: २ गुन्हे दाखल
​वाढवणा पोलीस ठाणे: २ गुन्हे दाखल
​जळकोट पोलीस ठाणे: १ गुन्हा दाखल
​या कारवाईमध्ये पोलिसांनी ३२० लिटर हातभट्टी दारू (अंदाजे किंमत रु. २३,०००) आणि ३९ देशी दारूच्या बाटल्या (किंमत रु. २,४४५) असा एकूण २५,४४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

​या यशस्वी कारवाईमुळे परिसरात अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर वचक बसला असून, समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची ही मोहीम कौतुकास्पद ठरली आहे. उपविभागीय अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पोलीस प्रशासनाच्या या भूमिकेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!