शिरूर ताजबंदच्या जनतेच्या वतीने कोकणातील पुरग्रस्थांना तहसीलदारांकडे निधी सुपूर्द

शिरूर ताजबंदच्या जनतेच्या वतीने कोकणातील पुरग्रस्थांना तहसीलदारांकडे निधी सुपूर्द

अहमदपुर (गोविंद काळे) : सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरामुळे जनजिवन विस्कळित झाले असून कोकण विभागात तर पुराणे थैमान घातले आहे.अनेकांचे संसार उद्धवस्त झाले तर अनेक जण मृत्युमुखी पडले. मानुसकीचा धर्म पाळत शिरूर ताजबंदच्या जनतेच्या वतीने रोख रक्कमेच्या स्वरूपात आर्थिक मदत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे व तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या कडे सुपुर्त करण्यात आली असल्याने कोकण विभागातील जनतेला आधार देण्याचे कार्य शिरूर ताजबंदच्या ग्रामस्थांनी केले आहे. शिरूर ताजबंद येथील व्यंकटेश बहुउद्देशीय सेवा भावी संस्था, व्यापारी, डॉक्टर, कर्मचारी व सर्वसामान्य ग्रामस्थांकडून भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा च्या युवकांनी निधीचे संकलन केले.

तेहतिस हजार तिनशे, 33,300 रुपये चा पुरग्रस्थ निधी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते अहमदपुर चे उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या कडे नुकताच देण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती आर.डी.शेळके, महेश बिलापट्टे, शिवानंद भोसले, सादीक शेख, मच्छिंद्र कांडनगिरे, बिरादार एन.टी., व्यंकट धुळे, शिवराज पाटील, गोविंद गिरी, प्रताप पाटील, गजेंद्र वलसे, मारोती मोरे, हणमंत बडगिरे,शिवचंद्र मलफेदवार, ज्ञानोबा मंतलवाड, यशवंत कांबळे, रवी दावणगावे, रमेश कौरवार, दिलीप पाटील, नागनाथ बलशेटवार,बबन मलफेदवार, राजकुमार बदलला, शशिकांत पेदेवाड, विनायक खेडेकर यांच्या सह शिरूर ताजबंद येथील नागरिक यावेळी उपस्थित होते.

About The Author