महात्मा फुले महाविद्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी

महात्मा फुले महाविद्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महान सेनानी, प्रतिसरकारचे संस्थापक तथा थोर समाजक्रांतीकारक क्रांतिसिंह नाना पाटील यांची १२१ वी जयंती येथील महात्मा फुले महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी कोविडचे नियम पाळून उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!