काजळ हिप्परगा येथे अण्णाभाऊ साठे जयंती विविध उपक्रमाने साजरी

काजळ हिप्परगा येथे अण्णाभाऊ साठे जयंती विविध उपक्रमाने साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील काजळ हिप्परगा येथे अण्णाभाऊ साठे जयंती वेगवेगळी उपक्रम राबवून साजरी करण्यात आली,
या जयंतीनिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले त्यात ३४ युवकांनी आपला सहभाग नोंदवत रक्तदान केले, गावातील मुख्य रस्त्यावर व शाळेतील प्रांगणात १०० वृक्षाची लागवड करण्यात आली व शाळेतील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले,गावात मास्क वाटप आणि आंबाजोगाई ते अहमदपूर रस्त्यावर गावात बसथांबा असलेल्या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी चार बाकड्याची सोय करण्यात आली. शाळेत विध्यार्थ्याना किलोमीटर दर्शवनारे फलक लावण्यात आले. र्सवप्रथम उपसरपंच सुरेश नवटक्के यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करूण ध्वजारोहन करण्यात आले, यावेळी ग्रामसेवक राजाराम कांबळे, मा.सरपंच सतीश नवटक्के, ज्ञानोबा बेंबडे, गणेश चामवाड, अनिल बेंबडे, इस्माईल आत्तार, राजाराम नामपल्ले, व्यंकट वाघमारे सतिष नामपल्ले, प्रविन जंगापल्ले, आशिष जंगापल्ले, यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रल्हाद कापसे प्रमुख पाहुणे प्रा.मनोज रेड्डी, बाबुराव जंगापले, दिलीप कापसे, अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जंगापले हे मंचावर उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संमेश्वर जंगापले आणि अजय जंगापल्ले यांनी केले. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले.

About The Author