अहमदपूर येथे अंबादास कोरनुळे यांच्या घरी फुलले ब्रम्हकमळ
अहमदपूर (गोविंद काळे) : पावसाळ्याच्या दिवसांत खास करून श्रावण महिना ते गणपती या दरम्यान अंधार्या रात्री उगवणारे ब्रम्हकमळ हे सुंदर फुल आहे. हे फड्या निवडुंगाचे फुल वर्षातून एकदाच फुलत असल्याने ते दुर्मीळच आहे. मात्र यंदा अधीक महिना अगोदर आल्याने श्रावणा अगोदरच हा दुर्मीळ योग साधला गेला आहे. तो अहमदपूर येथील राहणारे अंबादास कोरनुळे व राजश्री अंबादास कोरनुळे यांचे घरी बुधवारी ब्रह्मकमळ रात्री 12 वाजताच्या नंतरच्या दरम्यान फुलण्याचा योग साधला गेला आहे. यावेळी कोरनुळे पती, पत्नी, मुले आदी कूंटुंबीयांनी यांनी रात्री 12:40 वाजता या फुलांची विधीवत पुजा केली. या फुलाचा थोडयात इतिहास पाहावयास गेला तर ब्रम्हकमळाच्या काटे नसतांत त्यांची पाने मासंल व हिरवी पोपटी लांबट असतांत अंधा-या रात्री फुलणा-या हया ब्रम्हकमळावर किटकांना पराग सिंचनासाठी आकर्षित करण्याचा हेतु असतो.निवडुंग कुळातील हे ब्रम्हकमळ ऐफिफायलम बीन्यानमध्दाह जात मळु मेक्शकोएमध्ये अमेरिका इत्यादी भागात बागेची शोभा वाढविण्यासाठी भारतात आणली गेली आहे. या फुलाचा पानासारखा दिसणारा हिरव्या रंगाचा भाग हे या वनस्पतीचे खोड अनुकांडे म्हणतात.पकडायला असणा-या खाचेतुन या ब्रम्हकमळाचा उगम होतो पांढ-या रंगाची 4 ते 12 इंच लांबीची हि फुले जनु ऑगस्ट ते सष्टेंबर महिन्यात उगवतात.कळी मोठी होते तसे फुल हळु हळु रात्री 12 वाजेपर्यत हे ब्रम्हकमळ पुर्ण फुलते. निशोन्मिलीन अशा ब्रम्हकमळाची शोभा अवर्णीय आहे.