उदयगिरी महाविद्यालयाचा अभिमान : विद्यापीठातून एम.एस्सी. कॉम्प्युटर मॅनेजमेंटमध्ये टॉप तीन
उदगीर (प्रतिनिधी) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड तर्फे उन्हाळी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या एम.एस्सी. (कॉम्प्युटर मॅनेजमेंट) परीक्षेत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेच्या अधिकृत मेरिट यादीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले आहेत. विद्यापीठाने जाहीर केलेल्या गुणक्रमानुसार गुलफुले पूर्निमा सिताराम हिने 2200 पैकी 1743 गुण मिळवत 79.23% गुणांसह प्रथम रँक मिळवला, बिरादार राजश्री अप्पाराव हिने 1670 गुण (75.91%) मिळवत द्वितीय रँक पटकावला तर सोनटक्के लक्ष्मण नागनाथ याने 1622 गुण (73.73%) मिळवत तृतीय रँक पटकावला. या यशामुळे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा शैक्षणिक लौकिक उंचावला असून विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सर्व सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. व्ही. आवाळे, विभागातील प्रा.राहुल बिरादार, प्रा. गौस शेख, प्रा. जैतून मोमीन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
