अक्षरभूषण पुरस्काराने मिथुन वाडीकर यांना सन्मानित करण्यात आले
उदगीर (प्रतिनिधी)
येथील अक्षरनंदन मराठी प्राथमिक शाळा मलकापूर येथे समर्थ सेवाभावी संस्था धनेगाव मार्फत आदर्श शिक्षक मिथुन राजेंद्र वाडीकर यांना अक्षरभूषण पुरस्काराने सपत्नीक सन्मानित करण्यात आले. तसेच आदर्श विद्यार्थी कुमारी जोया शरीफ वाडीवाले व कुमारी श्रेया संजय गायकवाड यांना अक्षररत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी समर्थ सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भारतबाई सावळे, प्रमुख पाहुणे दत्तात्रेय बिरादार, महेश तोडकर, साईनाथ वाघमोडे ,अक्षरनंदन शाळेचे मुख्याध्यापक शिवशंकर जीवने व शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला.
