अहमदपूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा
अहमदपूर (गोविंद काळे): जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त अहमदपूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी एक विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ३५ वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात अविरत सेवा देणाऱ्या जेष्ठ फार्मासिस्ट बंधूंचा आणि अहमदपूर तालुक्यातील सर्व केमिस्ट बंधू व भगिनींचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदकिशोर बजाज हे होते. यावेळी जेष्ठ फार्मासिस्ट संगमेश्वर नीला, बालाजी कोडगिरे, नाथराव मुंडे, मलीकारजुन हेंगणे, राजू सिद्धेश्वरे आणि प्रवीण कापसे यांना त्यांच्या दीर्घकालीन आणि महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल गौरविण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जोशी, जिल्हा सह सचिव संगमेश्वर नीला आणि सुनील मजगे सर यांचे उपस्थितांना मार्गदर्शन लाभले. त्यांनी फार्मासिस्टांच्या समाजातील योगदानाचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे आभार तालुका सचिव धनंजय कोतावार यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगमेश्वर नीला, धनंजय कोतावार, तालुका कोषाध्यक्ष आकाश जोशी, आदित्य जोशी, कृष्णा गोरे, ओम भाटे, मललिशे आणि स्वामी यांनी विशेष परिश्रम घेतले.
हा सोहळा स्वरुची भोजनानंतर उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
