महात्मा गांधी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात; विविध उपक्रमांसह तीन प्रकाशन सोहळे

0
महात्मा गांधी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात; विविध उपक्रमांसह तीन प्रकाशन सोहळे

​अहमदपूर ( गोविंद काळे) – येथील विचार विकास मंडळ संचलित महात्मा गांधी महाविद्यालयात १७ सप्टेंबर २०२५ रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
​सकाळी ८.०५ वाजता राष्ट्रध्वजाला सलामी देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. या विशेष दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात तीन महत्त्वपूर्ण प्रकाशन सोहळे पार पडले.
​महत्त्वाचे प्रकाशन सोहळे:
​१. भित्तीपत्रकाचे प्रकाशन: मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘मराठवाडा: काल आणि आज’ या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.
२. पोस्टर प्रकाशन: भौतिकशास्त्र विभागाने तयार केलेल्या ‘भौतिक शास्त्रातील वैज्ञानिक संकल्पना’ या पोस्टर्सचे प्रकाशन करण्यात आले.
३. पुस्तकाचे प्रकाशन: प्राणीशास्त्र विभागातील डॉ. आर. बी. देसाई आणि प्रा. डी. जी. पुरी यांनी नवीन शैक्षणिक धोरणाला (NEP) अनुसरून लिहिलेल्या बी. एस्सी. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठीच्या ‘डेव्हलपमेंट बॉयलॉजी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
​या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अँड. किशनराव बेंडकुळे, उपाध्यक्ष युवराज तातेसाहब पाटील, सहसचिव अँड. वसंतराव फड, सहसचिव सुरेशराव देशमुख, कोषाध्यक्ष रामचंद्रराव शेळके, संचालक बापूसाहेब कदम, मधुकरराव देशमुख आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
​भित्तीपत्रकाचे मार्गदर्शक डॉ. आर. डी. भामरे, डॉ. यादव सूर्यवंशी, प्रा. पी. आर. अर्जुन, प्रा. श्रीकांत बेंबडे, आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. अनिल जाधव यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
​भित्तीपत्रक आणि पोस्टर्स लेखन करणाऱ्या आदित्य कदम, ऐश्वर्या गंगथडे, स्नेहा करले, जिनत बायजित, शाहेद खुरेशी, स्वामी स्वरांजली, चापटे तनुजा, बनसोडे रोहिणी, कोमल शिरसाठ, कांबळे मानसी, शेख तहुरा, प्रिया फुलमंटे, हांडे मीरा, पिचारे अनुष्का, सकनुरे रूपाली, कांबळे अंजली या विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!