महात्मा गांधी महाविद्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेचा उत्साहात शुभारंभ

0
महात्मा गांधी महाविद्यालयात 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेचा उत्साहात शुभारंभ

​अहमदपूर ( गोविंद काळे) – विचार विकास मंडळ संचलित महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर आणि नगरपरिषद अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छता ही सेवा’ ही विशेष मोहीम (Swachhata Hi Seva Campaign) मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
​शासनाच्या ‘श्रमदान – एक दिवस – एक तास – एक साथ’ या परिपत्रकानुसार ही मोहीम राबवण्यात आली. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि नगरपरिषदेच्या संयुक्त सहकार्यातून महाविद्यालय परिसर आणि अहमदपूर प्रभाग क्रमांक पाच मध्ये श्रमदान करण्यात आले.
​या मोहिमेला अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती मंजुषा लटपटे आणि अहमदपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. संतोष लोमटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार, उपप्राचार्य डॉ. अनिल कांबळे व डॉ. जे. पी. कुलकर्णी, तसेच एनएसएस कार्यक्रमाधिकारी डॉ. बी. के. पाटील, प्राध्यापक डी. जी. पुरी, डॉ. पी. एल. देशमुख, प्रा. प्रकाश डावरे हे देखील उपस्थित होते.
​यावेळी नगरपरिषदेचे कर्मचारी श्री. साहेबराव शेवाळे, श्री. राम पोपटवर, श्री. दिगंबर टोंगळे, श्री. विक्रम सोमवंशी यांच्यासह महाविद्यालयातील कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सर्वांनी मिळून महाविद्यालय परिसर स्वच्छ केला, तसेच प्रभाग क्रमांक पाच मधील परिसर साफ करून स्वच्छतेचा व समाजसेवेचा संदेश दिला.
​या प्रसंगी उपविभागीय अधिकारी श्रीमती मंजुषा लटपटे आणि मुख्याधिकारी श्री. संतोष लोमटे यांचा महाविद्यालयाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!