अहमदपूर नगरपरिषदामुळे शिवाजी चौकात पाण्याचा निचरा; तिघा मित्रांच्या ‘मॉर्निंग वॉक’मधून नागरिकांना दिलासा

0
अहमदपूर नगरपरिषदामुळे शिवाजी चौकात पाण्याचा निचरा; तिघा मित्रांच्या 'मॉर्निंग वॉक'मधून नागरिकांना दिलासा

​अहमदपूर (गोविंद काळे) शनिवार पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अहमदपूर नगरीतील अनेक सखल भागांत नाले तुडुंब भरले होते आणि रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहत होते. मात्र, शहरातील शिवाजी चौकात या परिस्थितीतही रस्त्यावर पाणी साचले नव्हते, हे दृश्य नागरिकांसाठी दिलासादायक ठरले. नगरपरिषदेने केलेल्या प्रभावी नालेसफाईमुळेच हे शक्य झाल्याचे निरीक्षण सकाळी ‘मॉर्निंग वॉक’साठी बाहेर पडलेल्या शहरातील तीन प्रतिष्ठित नागरिकांनी नोंदवले.

​, भर पावसामध्ये प्रा.डॉ. बालाजी कारामुंगीकर, प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील, आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी गोपीनाथ राजपांगे या तिघांनी पहाटे पावणेसहा वाजता आपल्या घरापासून अहमदपूर शहराची पूर्ण चक्कर मारली.

​यावेळी त्यांचा मार्ग गोपीनाथ मुंडे चौक, सानवी मंगल कार्यालय, मरशिवनी चौक, मरशिवनी तांडा, तसेच रिंग रोडने थोडगा ब्रिज, रवींद्रनाथ टागोर शाळा, थोडगा पॉईंट, शिवाजी चौक, सावरकर चौक, शिवलिंग शिवाचार्य महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथून परत गोपीनाथ मुंडे चौक आणि घर असा होता.

​या ‘वॉक’दरम्यान त्यांनी पाहिले की, शहरातील अनेक भागांत पाऊस सुरू असल्याने नाले तुडूंब भरले होते आणि रस्त्यांवरून पाणी वाहत होते. मात्र, शिवाजी चौकात नगरपरिषदेने केलेल्या नाले सफाईमुळे पाण्याचा निचरा जलद गतीने झाला. त्यामुळे एवढा जोरदार पाऊस होऊनसुद्धा या महत्त्वाच्या चौकात रस्त्यावर पाणी आले नव्हते.

​हा बदल तिन्ही मान्यवरांना विशेष आणि खूप चांगला वाटला. इतर ठिकाणी नागरिकांना जलमय रस्त्यांचा सामना करावा लागत असताना, शिवाजी चौकातील हे दृश्य नगरपरिषद प्रशासनाच्या कामाची पावती देणारे ठरले आहे.

​नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पावसाळी कामांमध्ये नगरपरिषदेने दाखवलेली तत्परता आणि परिणामकारकता अभिनंदनास पात्र आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!