शासकीय रेखाकला एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षा सुरळीत
यशवंत विद्यालयातील परीक्षा केंद्रावर एलिमेंटरी 356 विद्यार्थी तर इंटरमिजिएट 364 विद्यार्थी
अहमदपूर( गोविंद काळे ) कला शिक्षण मंडळ मुंबई पुर्वीचे
महाराष्ट्र राज्य कला संचालनालय
यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या ‘शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षा 2025’यशवंत विद्यालय अहमदपूर येथिल परीक्षा केद्रावर विद्यालयातील 242 विद्यार्थ्यांसह बाहेरील बारा शाळेचे विद्यार्थी परीक्षा केद्रावर 721 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
ग्रेड परीक्षा दि. 24 सप्टेंबर रोजी सुरू झाली असून या परीक्षेसाठी यशवंत विद्यालयातील केंद्रांवर एलिमेंटरी, इंटरमिजिएट ग्रेडसाठी एकूण 242 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
या परीक्षेत एकूण चार विषय असून एलिमेंटरी साठी
वस्तुचित्र, स्मरणचित्र, संकल्पचित्र आणि भूमिती व अक्षरलेखन हे विषय आहेत. तर इंटरमिजिएट साठी स्थिरचित्र, स्मरण चित्र,संकल्पचित्र व कर्तव्य भूमिती व अक्षरलेखन असे विषय आहेत.
ग्रेड परीक्षेचे केंद्र संचालक म्हणून मुख्याध्यापक गजानन शिंदे, सहाय्यक केंद्र संचालक तथा कला शिक्षक महादेव खळुरे हे काम पहात आहेत. पर्यवेक्षक म्हणून राजेश चौधरी, निलकांत उगीले,श्रीमती आसमा सय्यद,दुर्गाप्रसाद गुरुडे, नंदकुमार कंजे, फारुक काझी, सुधिर शेटकार, शशिकांत बने, सुर्यकांत कदम, मनोहर गित्ते, प्रकाश केंद्रे, किरण भुरे हे काम पहात आहेत.
सदरील परीक्षेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी मागील दोन महिन्यात सहकेंद्रप्रमुख तथा कला विभागप्रमुख महादेव खळुरे आणि कलाशिक्षक, नागनाथ स्वामी, तुकाराम देवकत्ते,विवेकानंद मठपती, जयप्रकाश हाराळे,सुभाष चिट्टे, भास्कर लोहकरे, संभाजी भोपे, दिपक हालकंचे,पुरुषोत्तम काळे आदींनी विद्यार्थ्यांच्या कला विषयातील उत्साह वाढवून या परीक्षेसाठी मुलांना बसविण्यासाठी परिश्रम घेतले.
यशवंत विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रमाकांत बानाटे परिश्रम घेत आहेत.
