छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून व्याख्यानाचे आयोजन
उदगीर (प्रतिनिधी)छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने २९ सप्टेबर २०२५ रोजी शहीद भगतसिंह यांच्या जयंती निमित्त व माहिती अधिकार दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे हे होते, तर प्रमूख पाहूणे व व्याख्याते म्हणून डॉ. प्रशांत माने इंग्रजी विभाग, डॉ. एस. एम. कोनाळे राज्यशास्त्र विभाग हे उपस्थित होते. युवकांमध्ये देशभक्ती, साहस,त्यांचे आदर्शाचे स्मरण करण्यासाठी ‘ त्याग,क्रांती आणि समाजपरीवर्तन – भगतसिंगाचा मार्ग’ या विषयावर डॉ प्रशांत माने यांनी मार्गदर्शन केले. तर ‘माहिती अधिकार दिन’ या निमित्ताने ‘ माहिती अधिकार कायद्याचा प्रवास: यश ,अपयश आणि आव्हाने ‘ या विषयावर माहिती अधिकार कायद्यातील तरतुदी आणि कार्यपद्धती विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी डॉ.एस. एम.कोनाळे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ.हरीभाऊ ढगे यांनी मानले, तर प्रास्ताविक मुख्य कार्यक्रमाधिकारी डॉ. अतिष आकडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
