एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी अहमदपूरमध्ये धनगर समाजाचे धरणे आंदोलन
अहमदपूर ( गोविंद काळे): धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक, अहमदपूर येथे धनगर समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज रस्त्यावरची लढाई लढत असून, सध्या याच मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड चौफुला येथे धनगर समाजाचे संघर्ष योद्धा दीपक (भाऊ) बोराडे हे गेल्या पंधरा दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्याच आदेशानुसार अहमदपूर येथे हे धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाच्या वेळी मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवाजीराव खाडेकर, हनुमंतराव देवकत्ते, बालाजी बैकरे, दिनकर बडुरे, अॅड सोमनाथ फुले आणि विट्टल तरडे यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत प्रहार केला.
वक्त्यांनी, “भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळणे आवश्यक आहे. राज्य सरकारने आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी,” अशी मागणी केली.
या धरणे आंदोलनात पांडुरंग लोकरे, अनंत देवकत्ते, गणेश पोले, डॉ. पाडुरंग ठोम्पे, कुलदीप हाके, सुर्यकांत चिगळे, गोविंद बैकरे, लिंबराज बैकरे, बालाजी पारेकर, खंडू शेवाळे, बालाजी सुरणर, लखण घोडके, ज्ञानेश्वर बनसोडे, किरण बारमाळे, हरिओम होळकर, तुकाराम लोकरे, नाना नरवटे, गोपाळ माणे, बंडू सुरणर, गणेश लोकरे, अजित सुरणर, तुकाराम सुरणर, रवी देवकत्ते, ज्ञानेश्वर देवकत्ते, पिनू पाटील, मारोती हाके, सोपान हाके, बबलू नरवटे, आशिष सुरणर, संतनु सुरणर, नागनाथ वाडकर, गोपाळ वाडकर, शिवाजी वाडकर, गजानंद घोडके, योगेश पोले, सोपान कोळगीर, सुरज लक्षकरे, महेश खांडेकर, विजय घोडके, सुर्यकांत देवकत्ते, नागनाथ पारेकर, मारोती माणे, वसंत उमाटे यांच्यासह अनेक धनगर समाज बांधव उपस्थित होते.
