प्रयागबाई पाटील महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कला शाखेतून देशमुख सानिया प्रथम तर वाघमारे निलेश द्वितीय
लातूर (प्रतिनिधी) : लातूर येथील कै. प्रयागबाई पाटील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बारावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून या महाविद्यालयाने मागील अकरा वर्षापासून लातूर पॅटर्नच्या शैक्षणिक विकासामध्ये भर घालण्याचे कार्य केले आहे. 2021 च्या बारावी बोर्ड परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा दि. 4 ऑगस्ट रोजी महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
एप्रिल 2021 च्या बारावी बोर्ड परीक्षेच्या मूल्यमापनावर आधारित निकालात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयातून एकूण २५४ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यातील १९५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. तसेच 50 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. कला शाखेतून प्रथम देशमुख सानिया मुबिन ९०.१७, व्दितीय वाघमारे निलेश कमलाकर ८५.६७, तृतीय चौधरी योगेश्वरी राम ८४.००, तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम वलाकटे श्रद्धा अंगद ९५.३३, द्वितीय झंवर जीवन बालाप्रसाद ९१.८३, तृतीय बिडवे ममता विनायक ९०.१७, विज्ञान शाखेतून प्रथम जाधव अशिष संपत ९२.८३, व्दितीय बरुरे सायली संजय ९१.३३, तृतीय कुवेस्कर आदिती विद्याधर ९०.६६ यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या वेळी सदर विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य एकनाथ पाटील, सीए संभाजी सरडे, सीए दिगंबर साके यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष किसनराव पाटील, संस्था सचिव एकनाथ पाटील, संभाजी सरडे, दिगंबर साके, प्रा.सतीश जाधव, प्रा.प्रसाद लवटे, प्रा. महादेव ठाकूर प्रा.वर्षाराणी कांबळे, प्रा. महादेव बरुरे, प्रा. सुरकुटे भगवान, प्रा. शिवानंद क्षीरसागर, प्रा.जाकीर कादरी, प्रा. सुरेंद्र खपाटे, प्रा. जाधव प्राची, प्रा. पंड्या गोविंदलाल, प्रा. सुर्यवंशी आनंत, प्रा. मोटेराव बळीराम, कमलाकर वाघमारे तसेच शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.