बसस्थानक परीसराची स्वच्छता करुन सार्वजनिक सौचालय उभारण्याची मागणी नागरीकांसह व्यापाऱ्यांनी केली

बसस्थानक परीसराची स्वच्छता करुन सार्वजनिक सौचालय उभारण्याची मागणी नागरीकांसह व्यापाऱ्यांनी केली

औराद शहाजानी (भगवान जाधव) : येथील बसस्थानक जवळील परिसरातील रहीवासी व व्यावसायिक नागरिकांना परीसरातील खुल्या जागेत व रस्त्यावर सध्या काटेरी झुडपे वाढल्यामुळे तेथे घाणीचे साम्राज्य झालेले आहे त्यामुळे तेथे दुर्गंधीचा तसेच फिरत्या डुकरांचा व कुत्र्यांमुळे पडलेली घाण परीसरात पसरावित असल्याने दुर्गंधी येत आहे. या परीसरात सुवर्णकार व्यावसायिक लोकांची दुकाने असल्याने या दुकानांमध्ये सतत महिला वर्ग जास्त प्रमाणात येत असतात व या येणाऱ्या महिलांना आणी परुषांना येथे सार्वजनिक सौचालय नसल्यामुळे उघड्यावर लघवीला जावे लागत आहे तसेच या परीसरात झुडपे पसरली असल्यामुळे या झुडपांचा आडोसा घेऊन कांही लोक उघड्यावर सौचास जात आहेत म्हणुन या घाणीमुळे डेंग्यू सारख्या रोगराई पसरण्याची शक्यता जास्त वाढल्याने आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे तसेच मागच्या वर्षी या परीसरातील एक लहान मुलगी डेंग्यू सारख्या आजारामुळे दगावली होती. सध्या औराद परीसरात डेंग्यू सारख्या आजाराचे कांही प्रभागात रुग्ण आढळुन येत आहेत म्हणून नागरीकांनी साफसफाई करुन हा परिसर स्वच्छ करण्यासाठी व या परिसरामध्ये सार्वजनिक शौचालय उभा करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केलेली आहे. विषेश म्हणजे हे निवेदन देण्यासाठी नागरीक ग्रामपंचायत मध्ये गेले असता सरपंच गैरहजर होत्या व उपसरपंच आणी ग्रामसेवकांनी हे निवेदन स्विकारुन लवकर स्वच्छता करण्याचे आश्वासन दिले.

About The Author