छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात क्रीडा विभागाच्या वतीने विशेष व्याख्यान संपन्न

0
छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात क्रीडा विभागाच्या वतीने विशेष व्याख्यान संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) येथील छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी क्रिकेट खेळाचे नियम व कौशल्य या विषयावर विशेष व्याखानचे आयोजन महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये करण्यात आले होते. प्रा. डॉ. शिवानंद पाटील क्रीडा संचालक कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय उदगीर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात खेळाडुंना क्रिकेट खेळाबद्दल विविध कौशल्य व विविध नियमाबद्दल सखोल मार्गदशन केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे हे होते. तर व्यासपीठावर डॉ विष्णू पवार, डॉ नेहाल अहमद यांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध क्रीडा प्रकारातील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ. रामकिशन मांजरे यांनी अध्यक्षीय समारोप केला.तर प्रा.डॉ. विष्णु पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन खो खो खेळाडु कु. गव्हाने दिपाली यांनी केले. क्रीडा संचालक प्रा.डॉ. नेहाल अहमद खान, देविदास उदगीरे यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य लाभले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!