राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचाराची समाजाला गरज : माजी मंत्री आ.संजय बनसोडे

0
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचाराची समाजाला गरज : माजी मंत्री आ.संजय बनसोडे

उदगीर (एल पी उगीले) : महात्मा गांधीजींचे जीवन म्हणजे सत्य, अहिंसा आणि साधेपणा या मूल्यांचे एक जिवंत आदर्श उदाहरण आहे. त्यांचे कार्य केवळ भारताच्या स्वातंत्र्यापुरते मर्यादित नव्हते, तर ते जगभरातील शांतता, न्याय आणि सामाजिक कार्यासाठी कायम प्रेरणास्त्रोत ठरले आहेत . आज समाजात वावरत असताना तरुण पिढीला महात्मा गांधीजींचे कार्य समजले पाहिजे, नव्या पिढीला राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचाराची गरज असल्याचे मत माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यानातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ध्यानस्त पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे,रमेश अंबरखाने, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, उषा कांबळे, सुधीर भोसले, फैजुखाँ पठाण, समीर शेख, प्रा.श्याम डावळे, वसंत पाटील, शशिकांत बनसोडे, अनिल मुदाळे, ॲड .दत्ता पाटील, बाळासाहेब पाटोदे, राजकुमार भालेराव, राजकुमार चव्हाण, नरसिंग शिंदे, फय्याज शेख, विलास शिंदे, नवनाथ गायकवाड, अशोक जमदाडे, शफी हाशमी, प्रदिप जोंधळे, वाहेद कुरेशी, रुपेंद्र चव्हाण, मधुमती कनशेट्टे, उर्मिला वाघमारे, ॲड. वर्षा कांबळे, वैशाली कांबळे, माया कांबळे, प्रीती कवटीकवार, संघशक्ती बलांडे, सतिश कांबळे, राजकुमार गंडारे, अविनाश गायकवाड, विश्वनाथ मुडपे, दिपक बलसुरकर, एस.एस. पाटील, कुणाल बागबंदे, फेरोज पठाण, संदीप देशमुख, शिवकुमार कांबळे, इमरोज हाशमी, इब्राहिम देवर्जनकर, नागेश आष्टुरे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची भूमिका अतुलनीय आहे, महात्मा गांधींनी अहिंसक मार्गाने, म्हणजे सत्याग्रह आणि असहकार चळवळींचा वापर करून ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला, ज्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधीनी केवळ राजकीय स्वातंत्र्यालाच नव्हे, तर सामाजिक सलोख्यालाही महत्त्व दिले आणि स्वतंत्र भारताला स्वावलंबी बनवण्याचा मार्ग दाखवला आहे. अशा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा ध्यानस्थ पुतळा प्रेरक राहणार असल्याचे मत आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले .
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धनंजय गुडसूरकर यांनी केले तर आभार अनिल कुरे यांनी मानले.
यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरीक, पक्षाचे कार्यकर्ते, नगर परिषदेचे कर्मचारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!