चिमुकल्या बालकासाठी अर्धापूर शहरातील प्रसिद्ध डॉ.शरद चरखा ठरले देवदूत..!

0
चिमुकल्या बालकासाठी अर्धापूर शहरातील प्रसिद्ध डॉ.शरद चरखा ठरले देवदूत..!

अर्धापूर : – उध्दव सरोदे

डॉ हे देवदुत असतात अशी लोकांची भावना आहे, ती अगदी बरोबर असून खरी ठरलीय, शहरातील एका सहा वर्षीय बालकाच्या अन्ननलिकेत मासोळीचा काटा अडकल्याने तो तडफडत होता. त्याला असह्य अशा वेदना होत होत्या, पण ज्याच्या नशिबाची दोरी बळकट असते,तो मृत्यूच्या दारात जाऊन परत येतो. अर्धापूर येथील प्रसिद्ध डॉ.शरद चरखा हे अशाच एका बालकासाठी साक्षात देवदूत बनून आले, व त्याला त्यांनी जीवदान दिले.शहरातील नवी आबादी येथील मुलगा शेख अकबर हा जेवण करत असतांना मासोळीचा काटा त्याच्या अन्ननलिकेत अडकला. त्यामुळे अकबर याला श्वास घेणेही अवघड झाले होते,तो सतत खोकलत होता,त्याचे रडणे पाहून घरातील सर्वच घाबरून गेले होते.त्या बालकास तात्काळ डॉ.शरद चरखा यांच्या रुग्णालयात नेण्यात आले. मुलाची चिंताजनक परिस्थिती असतांना त्याला खूप वेदना होत होत्या.त्याला श्वसनाला अडथळा येत होता.डॉ.शरद चरखा यांनी मुलाची परिस्थिती पाहून तातडीने उपचार सुरु केले आणि सहकाऱ्यांनी अथक प्रयत्न करून चिमुकल्याच्या अन्ननलीकेत अडकलेला मासोळीचा काटा काढला.कौशल्यपूर्ण उपचाराने संबंधित मुलाची प्रकृती आता स्थीर आहे.नातेवाईकांनी डॉ.शरद चरखा यांचे तुम्ही देवदूत आहात म्हणून आभार व्यक्त केले. डॉ.शरद चरखा हे गोरगरीब रुग्णांना दिलासा देऊन वेळोवेळी मदत करतात, त्यांच्या मनमिळाऊ स्वभावाचा ते रुग्णांना योग्य तो सल्ला देऊन त्यांच्यावर उपचार करतात त्यांचे असे हे एकच कौतुक नसून गेल्यावर्षी सुध्दा अशाच प्रकरणात मुलाचा जीव वाचवला व ईतर घटनेतूनही रूग्णांचे त्यांनी जीव वाचवलेले आहेत.त्यांच्या या कर्तव्य दक्षतेचे सर्व स्तरातून डॉ. शरद चरखा यांचे अभिनंदन होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!