शंकर बोईनवाड यांना श्री. संत किसन सूडके महाराज राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर

0
शंकर बोईनवाड यांना श्री. संत किसन सूडके महाराज राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर

उदगीर (प्रतिनिधी) : येथील साहित्यिक तथा पत्रकार शंकर बोईनवाड यांच्या आदर्श नगरीचा राजू या किशोर कादंबरीस श्री. संत किसन महाराज आश्रम, संतनगर – कांगोणी, ता. नेवासा जि. अहिल्यानगर चा श्री. संत किसन सूडके महाराज राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार जाहिर झाला आहे.संत नगर कांगोणी ता. नेवासा जि. अहिल्यानगर येथे एका विशेष कार्यक्रमात मान्यवर संताच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लिखाण करणाऱ्या शंकर बोईनवाड यांचा ” चिव चिव चिमणी ” व ” कोल्हेवाडीचा बाजार ” ही दोन बालकवीतासंग्रह व “आदर्श नगरीचा राजू ” ही किशोर कादंबरी अशी तीन पुस्तके प्रकाशीत आहेत. त्यांच्या साहित्य कृतीला परिवर्तन साहित्य संस्था नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिवचा परिवर्तन राज्यस्तरीय पुरस्कार, श्री. जयभवानी भक्तगण व सांस्कृतिक कला मंडळ रांझणी ता. पंढरपूर जि. सोलापूरचा राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार, संत गाडगेबाबा विचारमंच ओतूर ता. जुन्नर जि. पुणेचा राज्यस्तरीय बाल साहित्य पुरस्कार, नांदेड येथील यशवंतराव चव्हाण विचार मंचचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, हिंगोलीचा संत नामदेव राष्ट्रीय बाल साहित्य पुरस्कार, पिंपरी चिंचवडचा आचार्य अत्रे साहित्य गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांचे नांदेड आकाशवाणीवरून अनेक वेळा काव्यवाचन प्रसारित झाले आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!