लिटल एंजिल्स दत्तगुरू इंग्लिश स्कूलचे जलतरण व टेनिक्वाईट जिहास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

0
लिटल एंजिल्स दत्तगुरू इंग्लिश स्कूलचे जलतरण व टेनिक्वाईट जिहास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

उदगीर (प्रतिनिधी)
नुकत्याच अहमदपूर येथे पर पडलेल्या जिल्हास्तरीय टेनिक्वाईट 17 वर्षाखालील मुलांच्या क्रीडा स्पर्धेत लिटल एंजल्स दत्तगुरू इंग्लिश स्कूलच्या संघाने प्रथम क्रमांक तसेच जलतरण क्रीडा स्पर्धेत 14 वर्षा खालील 50 मी. फ्री स्टाईल मुले या गटातून आयुष कांबळे या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या दोन्ही संघाच्या खेळाडूंची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक प्रशांत भांगे यांनी मार्गदर्शन केले.
शाळेच्या व संस्थेच्या वतीने सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अमन ममदापुरे, सचिवा आशा ममदापुरे, मुख्याध्यापक सचिन पाटील उपमुख्याध्यापक माधव भांगे तसेच रवि चन्नाळे, सद्दाम मोमिन, सरफराज मनियार, अनिता सुवर्णकार, पवनकुमार पांचाळ, साहेबराव निकाळजे, राजेश्वरी पारसेवार, संगीता पोपलाई, प्रीती शेटकार, सारिका पेचफुले, शकुंतला डांगे, कविता तोंडारे, कविता क्षीरसागर, दिक्षालिनी शिंदे, आरती पवार आदींनी अभिनंदन केले तसेच पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!