मुखेडच्या रोटरी क्लबकडून मोफत आधुनिक पाय मोजमाप व वाटप शिबीर संपन्न !
मुखेड ता. प्रतिनिधी
शहरातील रोटरी क्लब मुखेड सिटी आणि रत्ननिधी चँरिटबल ट्रस्ट , मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आधुनिक पाय मोजमाप शिबीर व वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते. दि.04 आँक्टोंबर रोजी या शिबिरात महाराष्ट्र , कर्नाटक , तेलंगणा राज्यातील दिव्यांग लाभार्थी अतिशय अपेक्षा ठेवून उपस्थित राहिले होते .आँनलाईन नोंदणी 51 व्यक्तिंनी केलेली होती . प्रत्यक्षात मात्र 47 लाभार्थ्यांनी लाभ घेतला . समाजातील दिव्यांगांना स्वाभिमानाचं बळ आणि जगण्याची नवी उमेद उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे रोटरी क्लब कार्य आहे. जगाच्या पाठीवर सामाजिक दायित्व पूर्ण करणारी ही संस्था निस्वार्थ भावनेतून कार्य करीत असते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब मुखेड सिटीचे अध्यक्ष डॉ.उमाकांत पद्मावार , विशेष अतिथी म्हणून मुक्ताई प्रतिष्ठान , देगलूरचे सचिव राजेश महाराज देगलूरकर , जिल्हा नियोजन मंडळ सदस्य व जेष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ. माधव पाटील उच्चेकर , प्रमुख पाहुणे रत्ननिधी चँरिटबल ट्रस्टचे डॉ. राजेश माने , डॉ.रामसुजान साकेत तर व्यासपीठावर आध्या डायग्नोस्टिक सेंटर चे संचालक रो.डॉ. श्रीहरी बुडगेमवार , प्रोजेक्ट डायरेक्टर रो.डॉ. चंद्रकांत एकलारे , रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष जगदीश सेठ बियाणी , रो.डॉ. अविनाश पाळेकर उपप्राचार्य प्रा.संजीव डोईबळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रमाधिकारी रो.डॉ. चंद्रकांत एकलारे तर आभार प्रदर्शन क्लब मुखेड सिटीचे सचिव रो.डॉ. संजीव रेड्डी यांनी मानले.
मान्यवरांच्या सत्कार समारंभानंतर कार्यक्रम सुरू झाला. मान्यवरांच्या मार्गदर्शन प्रसंगी रो.डॉ. श्रीहरी बुडगेमवार , राजेश महाराज देगलूरकर , डॉ. माधव पाटील उच्चेकर यांनी दिव्यांग व्यक्ति हा सुध्दा समाजाचा अविभाज्य घटक आहे. त्यांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने कार्य करणे गरजेचे आहे. मुखेडमध्ये रोटरी क्लबच्या माध्यमातून सामान्यातील सामान्य माणसाला स्वातंत्र्य, समता,बंधुता आणि न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.कृत्रिम पाय उपलब्ध करून देणे पुण्याचे कार्य आहे. सदैव अशा व्यक्तिसाठी प्रत्येक जण तत्पर असायला हवे आहे असे विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात डॉ. पद्मावार यांनी रोटरी क्लब ची भूमिका , कार्यक्रम आयोजनामागील प्रयत्न , प्रत्येकांनी केलेले सहकार्य याविषयी आभार मानले. मुखेड तालुका व परिसराचा सामाजिक क्षेत्रात निश्चित विकास करण्यासाठी कटिबद्ध असणार आहेत. विधायक प्रस्ताव सादर करून येणाऱ्या काळात तालुक्यातील रोटरी क्लब चे कार्य आदर्श निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी लाभार्थी , रोटरी क्लब चे पदाधिकारी व सदस्य ,व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थितीत होते .
