अहमदपूरच्या बँक कॉलनीतील ‘शताक्षी नवरात्रोत्सव’ उत्साहात संपन्न!

0
अहमदपूरच्या बँक कॉलनीतील 'शताक्षी नवरात्रोत्सव' उत्साहात संपन्न!

​अहमदपूर ( गोविंद काळे ) येथील बँक कॉलनीतील शताक्षी नवरात्रोत्सव महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला नवरात्र उत्सव विविध समाजोपयोगी उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मंडळाच्या सदस्यांनी दहा दिवस विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले.
​समाजोपयोगी उपक्रमांची रेलचेल
​शताक्षी नवरात्रोत्सवानिमित्त यावर्षी दहा दिवस विविध समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत हा महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात आला. तसेच, ज्येष्ठांच्या हस्ते आरती करून त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमांमध्ये ‘सुगरणींची खाऊ गल्ली’ आणि सांस्कृतिक मनोरंजनासाठी दांडीया, आणि ‘बाईपण भारी देवा’ यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांसाठीही विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
​पदाधिकाऱ्यांचा सत्कार
​नवरात्र उत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शताक्षी नवरात्रोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अध्यक्षा प्राचार्या रेखाताई हाके-तरडे (लायनेस क्लबच्या अध्यक्षा), सचिव एडवोकेट मानसी हाके, उपाध्यक्षा प्राचार्या शोभा टोम्पे, व कोषाध्यक्षा शिवालिका हाके यांनी आपली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली. बँक कॉलनीतील महिलांच्या वतीने माळेगावच्या सरपंच राजश्री नागमोडे यांच्या हस्ते या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
​विसर्जन मिरवणुकीत देखाव्यांनी वेधले लक्ष
​नवरात्रोत्सवाच्या सांगतेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीत सादर करण्यात आलेल्या देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः सिंदूर ऑपरेशनने सर्वांचे लक्ष वेधले. एडवोकेट सुवर्ण महाजन, शिवालिका हाके, स्वाती स्वामी, ज्योती जाधव, शितल देशमुख, आणि पुनम मोरे यांनी देवीची वेशभूषा करून आकर्षक देखावा सादर केला. तसेच, संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या चिमुकल्यांनी पंढरीच्या विठ्ठल रुक्मिणीचा देखावा सादर करत बाल वारकऱ्यांचे भजन सादर केले.
​हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शताक्षी नवरात्रोत्सव मंडळाच्या महिलांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!