उजना येथे जगदंबा देवीची महाआरती आणि गुणवंत विद्यार्थी व भजनी मंडळांचा सत्कार
अहमदपूर ( गोविंद काळे )
अहमदपूर तालुक्यातील उजना गावी जगदंबा देवीची महाआरती आणि विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता हेगणे आणि मठाचे एरले महाराज यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली.
जगदंबा देवी उत्सव कमिटीच्या वतीने यावर्षी भजनी मंडळ गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि नृत्य कला असे विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. महाआरती संपन्न झाल्यानंतर लगेचच या उपक्रमांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थ्यांसह वारकऱ्यांचाही सन्मान
गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता हेगणे, शिवसेना जिल्हा कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले आणि कमिटीचे अध्यक्ष तथा शिवसेना उपतालुकाप्रमुख लहू बारवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या-पेनाचे बक्षीस वाटप करण्यात आले.
यावेळी गावातील वारकरी संस्थांचे सर्व भजनी मंडळी यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असलेल्या या भजनी मंडळांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
उपस्थित मान्यवर
कार्यक्रमास जगदंबा कमिटीचे सर्व पदाधिकारी, विजय बारवड, सुरज ठाकूर, कृष्णा ठोबरे, संग्राम वळसे, सूरज चेपूरे, आशीष मॅरेवड, अर्जुन ठोंबरे, मनोज रेमगुंडे, अबी कासले, अनिकात कासले, बाबाराव निवृत्ती बारवाड, लहू श्रीराम बारवाड, पवन कासल, तातेराव जोमदे, चेतन बारवाड यांच्यासह गावातील सर्व लहान-थोर भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
