डॉ.वैभव वाघमारे बाभळगावकर यांचे दुखद निधन. अहमदपूर ( प्रतिनिधि) येथील यशवंत विद्यालयाचे उप मुख्याध्यापक माधव वाघमारे बाभळगावकर यांचे कनिष्ठ चिरंजीव डॉ. वैभव माधव वाघमारे यांचे दि. चार रोजी शनिवारी सकाळी आठ वाजता मुंबई येथील खाजगी रुग्णालयामध्ये पोटाच्या आजारावर उपचार घेत असताना वयाच्या 22 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्याअंत्यविधी दि .5 रोज रविवारी सकाळी 9 वाजता अहमदपूर येथील बौद्ध स्मशानभूमीमध्ये करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, असा परिवार असून डॉ. वैभव वाघमारे हा राजस्थान राज्यातील देवळी येथील आर आर पशुवैद्यकीय महाविद्यालयायात दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता. त्यांच्या दुखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.