सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ अहमदपूर येथे धरणे निदर्शने..

0
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ अहमदपूर येथे धरणे निदर्शने..

अहमदपूर ( गोविंद काळे )
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर 6 ऑक्टोबर 2025 रोजी, कोर्टात थेट बुट फेकण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत संतापजनक घटना घडली असून हा हल्ला केवळ सरन्यायाधीश गवई यांच्यावरील नसून तो न्यायव्यवस्था आणि संविधानाच्या मूल्यांवर झालेला हल्ला आहे अशा पध्दतीने निवेदन देवून येथील सम्राट मित्र मंडळाच्या वतीने पुढाकार घेवून तहसील कार्यालयाच्या ओर धरणे व निदर्शने अंदोलन करण्यात आले.
तहसीलदार यांना सामूहिक दिलेल्या निवेदनात पूढे म्हटले आहे की,भारतीय लोकशाहीत न्यायव्यवस्थेला खूप महत्व आहे.अशा परिस्थितीत राकेश किशोर याचे कृत्य अतिशय नालायक पणाचे आहे.
अशा माथेफिरूवर कडत शासन करावे त्याची मालमत्ता केंद्र शासनाने जप्त करावी.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही तिव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. सदर गुन्हेगारावर कठोर कारवाई तातडीने करावी अशी मागणी पूढे करण्यात आली आहे.

या प्रसंगी सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष युवक नेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी,प्राचार्य
डॉ.श्रीकांत गायकवाड,गोविंदराव गिरी यांची समयोचित भाषणे झाली.या वेळेस तालूकाध्यक्ष
सोनकांबळे शरद,माजी नगराध्यक्ष सरस्वतीबाई कांबळे,बानाटे सचिन,कांबळे शरद, सय्यद तबरेज,भोसले विक्रम, बाळू आमले, कांबळे चंद्रकांत, मतीन शेख, राहुल तलवार, गणेश शिंगडे,गायकवाड बाळासाहेब,रत्नदिप परचंडेकर, भगवान कांबळे, आनंद लोखंडे, खंडू कांबळे, शिवाजी ढवळे, मारोती कांबळे, पांढरी परतवाघ, प्रकाश लांडगे, अंकुश कांबळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!