सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ल्याचा उदयगिरी परिवाराकडून निषेध

0
सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ल्याचा उदयगिरी परिवाराकडून निषेध

उदगीर (एल.पी. उगीले) देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती गवई यांच्यावरील झालेल्या हल्ल्याचा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या निषेध सभेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सदस्य सिद्धेश्वर पाटील, प्रा. मनोहरराव पटवारी, अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, उपप्राचार्य एस. जी. कोडचे, स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. ए. पी. मोरे, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी प्रा. डॉ. जी. जी. जेवळीकर, प्रा. प्रवीण जाहुरे, प्रा. डॉ. दत्ताहरी होणराव आदी वक्त्यांनी म्हटले की, देशाच्या न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च प्रतिनिधी असलेल्या सरन्यायाधीशांवर हल्ला होणे ही लोकशाहीसाठी धोक्याची बाब आहे. अशा घटना संविधानिक मूल्यांवर आघात करणाऱ्या असून समाजाने त्याविरुद्ध एकजूट दाखवणे आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकमताने निषेध ठराव मंजूर करून न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!