भगवान बुद्ध व बाबासाहेबांचे विचार परिवर्तनाचे दीपस्तंभ – ना. संजय शिरसाठ

0
भगवान बुद्ध व बाबासाहेबांचे विचार परिवर्तनाचे दीपस्तंभ – ना. संजय शिरसाठ

अहमदपूर ( गोविंद काळे)
अहमदपूर काळेगाव येथे भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना.संजय शिरसाठ म्हणाले की, “हे पुतळे चैतनेचे दीपस्तंभ ठरतील.आजचा हा पवित्र प्रसंग आपल्याला नवी ऊर्जा, नवा उत्साह देत असून प्रत्येकाला सत्य, न्याय, समता आणि बंधुतेची नवी बळकटी देणारा आहे.” यावेळी त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला बुद्ध-आंबेडकरी विचारांचा ‘पाईक’ बनण्याचे आवाहन केले.
अहमदपूर तालुक्यातील तक्षशिला बुद्ध विहार व विपश्यना भूमी काळेगाव येथे वर्षावास समापन सोहळा व भगवान बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापणेच्या वेळी शिरसाट बोलत होते.
मंचावर तक्षशिला बुद्ध विहार व विपश्यना भूमी काळेगावचे भिक्खू महाविरो थेरो,भिक्खे संघपाल महाथेरो,भिक्खू सरणंकर महाथेरो, भिक्खू सुमनो थेरो,भिक्खू धम्मघोष थेरो, भिक्खू एस.नागसेन बोधी,भिक्खू रेवत बोधी, भिक्खू एस नागसेन, भिक्खू रेवत बौद्धी, भिक्खू एस.नागसेन,भिक्खू बोधी धम्मो, श्रामनेर सोनुत्तर, श्रामणेर राहुल,भारतीय बौद्ध महासभा चैत्यभूमी मुंबईचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर, महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री ना.बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आ.संजय बनसोडे,माजी आमदार बब्रुवान खंदाडे, गणेश दादा हाके पाटील, व्ही एस पॅंथर चे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके, रिपाईचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब कांबळे, गोपीनाथ जोंधळे, डॉ.सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, सरस्वती कांबळे अरुण वाघम्बर, जीवनराव गायकवाड मूर्तीचे दायक अनुराधा भीमराव मोरे,शंतनू भीमराव मोरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना मंत्री संजय शिरसाठ म्हणाले की विहाराच्या विकासासाठी जे जे लागेल तै मी देण्यासाठी तयार आहे. पुढच्या वेळी मी येईल त्यावेळी हा रस्ता तयार झालेला असेल अशी ग्वाही दिली.
यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की आज जगाला बुद्ध हवा आहे जो शांतीने कारूण्याने जग जिंकतो आहे. त्यांच्या करुणेच्या शिकवणीतून मानवतेला नवी दिशा मिळाली आहे.त्यांचे विचार अनुसरण करणे म्हणजे मानवतेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचणे होय.आत्त दीप भव या उक्तीप्रमाणे स्वतःला स्वतःमध्ये पाहिला शिकलं पाहिजे चला आपण एकत्र येऊन त्यांच्या आदर्शाचे पालन करूया त्यांच्या संदेशाला जीवनात उतरवूया आणि समाजात उज्वल दीप पेटू या.
भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जगात पोहोचलेले आहेत ज्ञानाचे प्रतीक म्हणून आज सबंध जग त्यांच्याकडे पाहत आहे देशाला आपण समतेने मायेने दूर केले पाहिजे विषमता या देशातून हटली पाहिजे त्यासाठी प्रत्येकाने समता मुल काम करावे बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माच्या ओटीत टाकले आहे तेव्हा आपण सर्वांनी न्यायनीतीच्या सन्मार्गावर चालण्याची नितांत गरज आहे. असेही डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर म्हणाले.
यावेळी माजी आमदार बबब्रुवान खंदाडे, गणेश हाके पाटील, डॉ सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांनीही संबोधित केले. दिवसभर पूजा परित्राण पाठ, धम्मदेसना, पूज्य भिकू संघांनी केली कार्यक्रमाचे प्रस्ताविक व्ही एस पॅंथर चे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन बालाजी तुरेवाले,मारोती बुद्रुक पाटील, प्रा.राजेंद्र गुळवे यांनी केले तर आभार सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता मधुकर गायकवाड यांनी केले.
संपन्न झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा राज्यातील बुद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीच्या पदाधिकारी व धम्म सेवकाने परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!