आदित्य श्रीकांत पाटील शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक

0
आदित्य श्रीकांत पाटील शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक

लोकनेते न्यूज नेटवर्क
उदगीर (एल पी उगिले)
जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या लातूर शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उदगीर येथील माऊंट लिटरा स्कूलचा विद्यार्थी आदित्य श्रीकांत पाटील सर्वाधिक गूण मिळवून जिल्ह्यात सर्वप्रथम क्रमांक मिळवला आहे. आदित्य पाटील याने उत्कृष्ट कामगिरी करत विभागस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. त्यांच्या या घवघवीत यशाबद्दलच्या सर्वत्र कौतुक होत आहे. आदित्य ने पुन्हा एकदा आपली चमक दाखवली आहे.जिल्हा स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेत उदगीरच्या या खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.
विभागीय बुध्दिबळ स्पर्धेसाठी निवड
आगामी विभागिय स्तर स्पर्धेत लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांना क्रीडा प्रशिक्षक विरसागर काळे, दत्तात्रेय ठाकुर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रशिक्षणाखाली आदित्य ने सातत्य, शिस्त आणि एकाग्रतेच्या जोरावर हे यश मिळवले आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष बालाजी पोलावार, बस्वराज बिराजदार सचिव, राजकुमार चौधरी, प्राचार्य सूर्यकांत चवळे, उपप्राचार्य कल्पना चौधरी तसेच पालकवर्ग व क्रीडा प्रेमींनी या मन:पूर्वक अभिनंदन केले असून विभागस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट यश संपादन करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!