बॅडमिंटन स्पर्धेत समर्थ विद्यालयाच्या मुलींचा संघ राज्यस्तरावर.
उदगीर (प्रतिनिधी): तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातीचा १९ वर्षाखालील मुलींचा संघ विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम आला असून हा संघ राज्यस्तरावर खेळणार आहे.
धाराशिव येथील तुळजाभवानी इनडोअर स्टेडियम येथे शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत समर्थ च्या मुलींचा संघ प्रथम आला आहे. या संघात मृणाल नितीन पोतदार, नुपूर रामदास मलवाडे, राजनंदिनी मनोज लोया, समीक्षा उमाकांत मटके, प्रगती विनायक इंगळे या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आहे. या यशाबद्दल खेळाडू व क्रीडा शिक्षक किरण हाळीघोंगडे यांचे संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी, पर्यवेक्षक सिध्दार्थ बोडके, संस्था सदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, प्रयास चौधरी, प्रा. बी. एस. बाबळसुरे, रसूल पठाण यांच्या सह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
