आजचे बालक उद्याचे भविष्य घडवतील – रमाकातं बनशेळकीकर

0
आजचे बालक उद्याचे भविष्य घडवतील - रमाकातं बनशेळकीकर

उदगीर (एल.पी.उगीले) ‘आजचे बालक हे उद्याचे भविष्य घडवतील.’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रमाकांत बनशेळकीकर यांनी केले.ते जिव्हाळा ग्रुप उदगीरच्या वतीने आधुनिक भारताचे शिल्पकार देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विश्वनाथराव बिरादार माळेवाडीकर यांनी भूषविले.
बनशेळकीकर पुढे म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याचे उद्गाते व थोर स्वातंत्र्य सेनानी पंडित जवाहरलाल नेहरु यानी स्वतंत्र भारताचे भव्य दिव्य स्वप्न साकार करण्यात महत्वाची कामगिरी बजावली. भारत देश लोकशाही,धर्म निरपेक्ष व समाजवादी विचारांवर ठाम विश्वास ठेऊन या देशाची मजबूत पायाभरणी केली.तसेच त्यांचा वैज्ञानिक, औद्योगिक व कृषी क्षेत्रासाठी मोलाचे कार्य केले.त्यांनी ‘आराम हराम है.’हा नारा दिला.भाक्रा नांनगल हे आशिया खंडातील सर्वात उंच धरण बांधून कृषी क्षेत्राला फार मोठी देणगी प्रदान केली आहे.

या कार्यक्रमात सचिव डॉ.अशोकराव दारनुळे व शरणप्पा खेळगे यांचा वाढदिवसानिमित्त तर जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष दशरथराव शिंदे अपघातानंतर बरे झाले या बद्दल जिव्हाळा ग्रुपच्या वतीने सत्कार केला. याप्रसंगी देविदासराव नादरगे व जिव्हाळा ग्रुप चे उपाध्यक्ष अशोकराव बिरादार यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात विश्वनाथराव बिरादार यांनी नेहरूजीनी आधुनिक भारताचा मजबुत पाया रचला त्यामुळे देशाची पुढे वेगाने प्रगती झाली असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेच्या पुजनानी झाली. जिव्हाळा ग्रुपचे समन्वयक प्रा.डॉ. अनिल भिकाने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. चंद्रकांत रोडगे यानी आभार मानले.
कार्यक्रमास लक्ष्मीकांत बिडवई, मनोहर कुलकर्णी,डॉ. रमेश बिरादार, सोपानराव माने,रामराव मोमले, वैजनाथराव पंचगल्ले, शंकरराव साबणे,विठ्ठलराव फुलसे,अमृतराव देशपांडे, विक्रम हालकीकर, दिलीप कंधारे, मोहनराव खिंडीवाले, हरिश्चंद्र वट्टमवार, बाबुराव वाघमारे, हावगीराव आचारे, चंद्रकांत उप्परबावडे, चंद्रकांत पांचाळ, सचिन बापूरे आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!