आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत रेणापूर नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून शोभा शामराव आकनगिरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत रेणापूर नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून शोभा शामराव आकनगिरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
     रेणापूर (एल पी उगिले) येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या वतीने श्रीमती शोभा शामराव आकनगिरे यांचा उमेदवारी अर्ज 15 नोव्हेंबर शनिवार रोजी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल करण्यात आला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने होते.

येत्या 2 डिसेंबर रोजी रेणापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी मतदान होणार असून भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली रेणापूर शहरात कोट्यावधी रुपये खर्चाच्या केलेल्या विविध विकास कामाच्या आधारावर संपूर्ण ताकतीनीशी भारतीय जनता पार्टी निवडणूक रिंगणात उतरली आहे.
या निवडणुकीत नगराध्यक्षपद महिलेकरिता आरक्षित असून या पदासाठी भाजपाच्या वतीने श्रीमती शोभा शामराव आकनगिरे यांनी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत 15 नोव्हेंबर शनिवार रोजी दुपारी रेणापूर तहसील कार्यालय येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत सोट, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ भोसले, जिल्हा चिटणीस दशरथ सरवदे, माजी सभापती अनिल भिसे, उपसभापती अनंत चव्हाण, मंडल अध्यक्ष महेंद्र गोडभरले, शरद दरेकर, रेणापूरचे पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, शहराध्यक्ष अच्युत कातळे, किसान मोर्चाचे साहेबराव मुळे, महादेव साळुंखे, ॲड. मनोज कराड, सरपंच सुनील चेवले, रवींद्र नागरगोजे, नामदेव बोबडे, विष्णू गोरे, पद्माकर चिंचोलकर, रवींद्र पाटील, रामराव मोरे, विजय चव्हाण, श्रीकृष्ण मोटेगावकर, दत्ता सरवदे, चंद्रकांत कातळे, श्रीकृष्ण जाधव, संजय वीरुळे, दिलीप आकनगिरे, नारायण राठोड, महेश गाडे, मारूफ आतार, गणेश चव्हाण, राजकुमार आलापुरे, श्रीकृष्ण पवार, शेख शफी, दिलीप चव्हाण, गणेश माळेगावकर, शिवाजी जाधव, मच्छिंद्र चक्रे, अंकुश मोटेगावकर, लक्ष्मण खलंगरे, अंतराम चव्हाण, धम्मानंद घोडके, उत्तम चव्हाण, श्रीमंत नागरगोजे, ज्ञानेश्वर शिंदे, हनुमंत भालेराव, लखन आवळे, डॉ. मोहाळे, रफिक शिकलकर, सोपान सातपुते, राजकुमार आकनगिरे, नरसिंग येलगटे, इस्माईल बावचकर, संतोष राठोड, योगेश राठोड, शरद चक्रे, रमा चव्हाण, मनोज चक्रे, फारूक कुरेशी, शेख अजीम, जगन्नाथ कातळे, अंकित हाके, सलीम शेख, अवेज कुरेशी, लक्ष्मण दळवी, सोमनाथ व्यवहारे, रोहन पांचाळ, आर्षद तांबोळी, सोनू उरगुंडे, हुसेन पठाण, महेश वरवटे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!