लातूर शहरातील वाहतुक नियोजनाचे अनुशंगाने मंगल कार्यालय मालकांची बैठक

0
लातूर शहरातील वाहतुक नियोजनाचे अनुशंगाने मंगल कार्यालय मालकांची बैठक

लातूर (एल पी उगिले)
गेल्या अनेक दिवसापासून शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्याच्या संदर्भात पोलीस प्रशासन सक्रिय झाले आहे. याच पार्श्वभूमीवर लातूर शहरातील मंगल कार्यालय चालकांची आणि मालकांची बैठक घेण्यात आली. अधिक माहिती अशी की, लातूर शहरातील वाहनांच्या वाढलेल्या संख्येमळे पार्किंगची समस्या उद्‌भवून वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. तसेच शहरातील मंगलकार्यालयात लग्न समारंभ व इतर कार्यक्रमाकरीता येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची सोय नसल्यामुळे वाहतुक कोंडी होत आहे. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, लातूर शहर येथे दि.१५/११/२०२५ रोजी १७.०० ते १८.०० वा.चे दरम्यान लातूर शहरातील मंगल कार्यालयाचे मालकांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीस शहरातील ५० ते ६० मंगलकार्यालयाचे मालक उपस्थित होते.
बैठकीमध्ये मंगलकार्यालयात कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था करणेसाठी जवळील मोकळी जागा भाडेतत्वावर घेघेवून,त्यामध्ये पार्कीग करणे व त्यावर संरक्षणासाठी वॉचमन नेमणे बाबत पोलीसांनी सुचना केली असता, त्यास मंगलकार्यालयाचे मालकांनी सहमती दर्शवली आहे. तसेच मंगलकार्यालयात कार्यक्रमाचे बळी डी.जे. डॉल्वी लावता येणार नाही, कार्यक्रमामधील स्पीकरचा आवाज सकाळी ०६.०० ते २२.०० पर्यंत शांतता क्षेत्राकरीता ५० डी.बी ., निवासी क्षेत्राकरीता ५५ डी.बी ., व्यापारी क्षेत्राकरीता ६५ डी.बी, औद्योगीक क्षेत्राकरीता ७५ डी.बी . पर्यंत मर्यादित ठेवावा, कार्यक्रमाची वेळी रात्री १०.०० वा. पावेतो असेल या अटीशर्ती मंगल कार्यालय मालकांनी कार्यक्रमाचे आयोजकांना लेखी कळविणेवावत सांगण्यात आले आहे.
सदरची बैठक समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागातील पोस्टेचे प्रभारी अधिकारी व गोपनिय पोलीस अंमलदार यांनी आयोजीत केली होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!