महायुतीच्या उमेदवाराचा उदागीरबाबा यांच्या महाआरतीने प्रचाराचा शुभारंभ,

0
महायुतीच्या उमेदवाराचा उदागीरबाबा यांच्या महाआरतीने प्रचाराचा शुभारंभ,

उदगीर ( एल पी उगिले )
​उदगीर पंचक्रोशीतील नागरिकांचे आराध्य दैवत श्री उदागीरबाबांच्या समाधीस्थळी महाआरती आयोजित करून भक्ती भावाने दर्शन घेऊन महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. निवडणूक प्रचाराचा औपचारिक प्रारंभ राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीच्या वतीने करण्यात आला.
​या प्रसंगी राज्याचे माजी मंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर नीटुरे,माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे तसेच भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्वाती सचिन हुडे, माजी नगरसेवक सचिन हुडे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक पदा चे सर्व उमेदवार, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​कार्यकर्त्यांची एकजूट आणि नेतृत्वाची शिस्तबद्ध उपस्थिती यामुळे भाजपने या निवडणुकीत एक सुयोजित आणि प्रभावी प्रचाराला सुरूवात केल्याचे स्पष्टपणे जाणवले.
​उदगीर नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी भाजपचा आत्मविश्वास या शुभारंभातून प्रकर्षाने दिसून आला आहे.
उदगीर शहरातील सर्व जाती-धर्माच्या श्रद्धास्थानांना नतमस्तक होऊन तसेच सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून रॅलीच्या रूपाने मंगल कार्यालयात येऊन सभा संपन्न झाली. याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले की, उदगीर येथील युतीच्या उमेदवार सौ. स्वाती सचिन हुडे या विक्रमी मताधिक्याने विजयी होतील यात तीळ मात्र शंका नाही. उदगीरच्या जनतेला विकास पाहिजे. जनतेच्या विकासासाठी आपण वचनबद्ध आहोत. गेल्या सहा वर्षांमध्ये उदगीर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट आपण करून दाखवला आहे. आता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवार सौ स्वाती सचिन हुडे यांना उदगीरकर प्रचंड मताधिक्याने निवडून देतील याबद्दल कोणीही शंका व्यक्त करायचे कारण नाही. असेही आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले. विकासाची दिशा आणि जाण असलेले व्यक्तिमत्व म्हणून स्वाती हुडे यांच्याकडे पाहिले जाते. युतीच्या उमेदवाराला विजयी केल्यानंतर राज्य पातळीवर आणि देश पातळीवर आपल्याला मोठ्या प्रमाणात निधी मागता येऊ शकेल. हा विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण महायुतीच्या उमेदवाराला विजयी करावे असे आवाहन याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेश्वर नीटुरे यांनी केले आहे. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या मान्यवर नेत्यांनी सकारात्मक पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळत कार्य करावे असे आवाहन केले.
माजी नगरसेवक सचिन हुडे यांनी आभार प्रदर्शन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!