“स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती अभियान रॅली व पथनाटय”
उदगीर (एल.पी.उगीले)
राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक -२०२५ मध्ये मतदान करणे कामी नागरीकांमध्ये जनजागृती करून मतदानाचे प्रमाण वाढवावे, या अनुषंगाने SVEEP अंतगर्त मतदान जनजागृती करिता विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे बाबत निर्देश देण्यात आलेले आहे. त्या नुसार सुशांत शिंदे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदगीर नगरपरिषद, सोमनाथ जाधव मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व राम बोरगावकर तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार शहरातील नागरिकांमध्ये नगरपरिषदेच्या मंगळवार दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या दरम्यान होणाऱ्या निवडणुकीत नागरिकांनी शंभर टक्के सहभाग नोंदवून मतदान करावे, या हेतूने या रॅलीचे व पथनाटयाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व प्रथम सर्व मान्यवरांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून याठिकाणी नगरपरिषदेचे कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी बालाजी शेटे यांनी मतदार जनजागृतीपर गीत सादर केले. त्यानंतर पोस्ते पोदार शाळेच्या विद्यार्थ्यांनी मतदार यांनी मतदान करून आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडावी, या विषयाचे पथ नाट्य सादर केले. त्यानंतर सुशांत शिंदे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदगीर नगरपरिषद, सोमनाथ जाधव मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व राम बोरगावकर तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पोस्ते पोदार शाळेचे संचालक सुरज पोस्ते यांनी रॅलीची सुरुवात हिरवी झेंडी दाखवून केली. सदर रॅलीचा मार्ग डॉ भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकापासून – नगरपरिषद कार्यालय – छत्रपती शिवाजी महाराज चौक – उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे समारोप करण्यात आला.
नगरपरिषद कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी “मतदार राजा जागा हो – लोकशाहीचा धागा हो” या विषयावर मतदार जनजागृती हेतूने पथ नाट्य सादर केलं.
सदर कार्यक्रमच्या यशस्वितेसाठी नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी राधा जमाले, शिवशंकर मटके, मिसबा सिद्धीकी, प्रफुल अदावळे, विशाल गुडसूरकर, महारुद्र गालट, महसूल सहाय्यक विशाल कदम यांच्यासह पोस्ते पोदार शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी आदीनी मेहनत घेतली.
