जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त नवप्रसुत मातांना मार्गदर्शन
आयएमए वुमन्स विंगचा पुढाकार
लातूर (प्रतिनिधी) : जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आयएमए वुमन्स विंगच्या पुढाकारातून गर्भवती व नव प्रसुत मातांना स्तनपानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.या अंतर्गत शासकीय स्त्री रुग्णालय आणि एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात
कार्यक्रम संपन्न झाले.
जागतिक पातळीवर ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. आईच्या दुधाचे बाळासाठी असणारे महत्त्व पटवून देण्यासाठी या सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वुमन्स विंगच्या वतीने शासकीय स्त्री रुग्णालयात मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. वुमन्स विंगच्या अध्यक्षा डॉ. मोहिनी गानू,उपाध्यक्षा डॉ. प्रीती बादाडे,सचिव डॉ. राजश्री सावंत,बालरोग तज्ञ डॉ.धुमाळ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात डॉ.गानू यांनी बाळांच्या हाडांची वाढ व हाडांचे आरोग्य या संदर्भात माहिती दिली. आईचे दूध बाळासाठी अत्यंत आवश्यक आहे.त्यामुळे शरीरातील कॅल्शियमची वाढ होते. हाडांची वाढ होण्यासाठी कॅल्शियम व ‘ड’ जीवनसत्व आवश्यक असते. मोठया मुलांसाठी मैदानी खेळही आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.
डॉ.धुमाळ, डॉ.बादाडे यांनी स्तनपानाचे फायदे व त्याचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमास डॉ.मंजूषा कुलकर्णी, डॉ.गुरुडे, डॉ.नागुरे, डॉ.सूर्यवंशी यांच्यासह रुग्णालयातील परिचारिका तसेच गर्भवती व नवप्रसूत मातांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय आणि आयएमए वुमन्स विंगच्या संयुक्त विद्यमाने एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात कार्यक्रम संपन्न झाला.डॉ. विद्या कांदे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमास महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जमादार, समन्वयक डॉ. वर्षा कराड, संचालिका डॉ.
सरिता मंत्री, विभाग प्रमुख डॉ.डावळे, आयएमएच्या अध्यक्षा डॉ.सुरेखा काळे, वुमन्स विंगच्या अध्यक्षा डॉ. मोहिनी गानू,सचिव डॉ. राजश्री सावंत यांची उपस्थिती होती.
महाविद्यालयातील विद्यार्थी व परिचारकांनी स्तनपान या विषयावर माहिती देणारे फलक तयार केले होते. यावेळी डॉक्टर्स, रुग्ण व स्तनदा माता यांच्या प्रश्नोत्तराचा कार्यक्रमही संपन्न झाला. उपस्थित डॉक्टरांनी स्तनपानाचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमास डॉ.भट्टड, डॉ.शैला सोमाणी, डॉ.कोल्हे, डॉ.संजीवनी तांदळे, डॉ.चारू उदगीरकर, डॉ.कल्पना बजाज,डॉ.शितल हरणे यांचीही उपस्थिती होती.
फोटो ओळ:
१)शासकीय स्त्री रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आयएमए वुमन्स विंगच्या अध्यक्षा डॉ. मोहिनी गानू.बाजूस डॉ गुरुडे, डॉ. प्रीती बादाडे, डॉ.धुमाळ, डॉ मंजुषा कुलकर्णी ,डॉ. राजश्री सावंत,डॉ.सूर्यवंशी
२)एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात मार्गदर्शन करताना आयमए वुमन्सच्या अध्यक्षा डॉ.सौ. मोहिनी गानू. मंचावर डावीकडून सचिव डॉ.राजेश्री सावंत, डॉ सरिता मंत्री, डॉ वर्षा कराड,डॉ सुरेखा काळे, डॉ डावळे, डॉ विद्या कांदे.