मेहकर पोलिसांकडून पंधरा जनावरांना यशस्वी जीवनदान व गोमाता रक्षण समितीकडे सोपवण्यात आले
मेहकर (भगवान जाधव) : महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील भाळकी तालुक्यात मेहकर पोलिस ठाण्याची दबंग कार्य वाही
मेहकर पोलिस ठाण्याचे PSI नंदकुमार मुळे यांना इंचुर येथील नागरिकांनी फोन करून सांगितले की बाराळी औरद येथून के.ए.39 6178 या गाडीमध्ये जनावरे तस्करी होत आहे ही गाडी बाराळी औराद ते हुल्सुरच्या दिशेने निघालेली माहिती ही माहिती मिळताच नंदकुमार मुळे यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन लगेच ईंचुर गाव गाटले व गाडी दिसताच सिनेमा स्टाईल पाठलाग करत गाडी थांबवली आणि झडती घेतली असता त्या गाडीमध्ये दोन म्हशी,च्यार बैल,इतर नऊ जनावरे आढळून येताच ताब्यात घेतले आणि सुलतान कुरेशी इतर तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. सर्व जनावरांना कड्याळ येथील गोमाता रक्षण समितीकडे सोपवण्यात आले.वाहन जप्त करून मेहकर पोलिस ठाणे येथे त्यावर सुद्धा गुन्हा नोंद करण्यात आला.या दबंग कार्य वाही मध्ये मेहकर पोलिस ठाण्याचे ए.एस. आय चंद्रकांत, आकाश, रेड्डी, बिराप्पा, अर्जुन, गौस, यांनी मोलाचे सहकार्य करत हा सापळा यशस्वी झाला.आणि इंचर गावातील नागरिकांचे मेहकर पोलिस ठाण्याचे पी.एस. आय.नंदकुमार मुळे यांनी आभार मानले.