उदगीरमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त एकता रॅली उत्साहात संपन्न

0
उदगीरमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त एकता रॅली उत्साहात संपन्न

उदगीर (प्रतिनिधी): युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त उदगीरमध्ये भव्य एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, मातृभूमी महाविद्यालय, छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालय, श्री. हावगीस्वामी महाविद्यालय, बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय, लालबहादूर शास्त्री विद्यालय, विद्यावर्धिनी विद्यालय, श्यामलाल व श्यामार्य कन्या विद्यालय, साने गुरुजी विद्यालय या शैक्षणिक संस्थांसह विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, एनएसएस कार्यक्रमाधिकारी व एनसीसीचे कमांडर मोठ्या संख्येने सहभागी झाले.
रॅलीचे उद्घाटन उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसीलदार राम बोरगावकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, एनएसएस संचालक डॉ. मारोती गायकवाड, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उषा कुलकर्णी-उस्तुरे, जिल्हा समन्वयक डॉ. बालाजी होकरणे, माय भारत समन्वयक डॉ. केशव अलगुले व युवा अधिकारी शशांक राऊला उपस्थित होते. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांना डॉ. सिद्धेश्वर लांडगे व डॉ. दत्ताहरी होनराव यांनी सरदार पटेल यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनी शुभांगी फड हिने भारत मातेची वेशभूषा करून रॅलीचे आकर्षण वाढविले. मान्यवरांच्या उपस्थितीत नशामुक्त भारत, आत्मनिर्भर भारत, राष्ट्रीय एकात्मता व मतदान जनजागृती यासंदर्भातील शपथ देण्यात आली. रॅली जिल्हा परिषद मैदान ते लालबहादूर शास्त्री विद्यालय या मार्गे यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. बिभीषण मद्देवाड, डॉ. धनराज बंडे, डॉ. गणेश बेळंबे, डॉ. आतिष आकडे, डॉ. विश्वनाथ भालेराव, डॉ. नीलकंठ वगशेट्टे, डॉ. कातकेडे, प्रशांत साबणे यांसह अनेक एनएसएस कार्यक्रमाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!