धर्मनिष्ठ उमेदवाराचे कृतीतून दर्शन! गौमातेवर केले अंत्यसंस्कार, ॲड. स्वप्नील व्हत्ते यांचे सर्वत्र कौतुक

0
धर्मनिष्ठ उमेदवाराचे कृतीतून दर्शन! गौमातेवर केले अंत्यसंस्कार, ॲड. स्वप्नील व्हत्ते यांचे सर्वत्र कौतुक

पोलीस फ्लॅश न्यूज ​अहमदपूर ( गोविंद काळे ) राजकारणात समाजकारण आणि धर्मनिष्ठा जपणाऱ्या व्यक्ती फार कमी असतात, पण अहमदपूर येथील भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ॲड. स्वप्नील भैय्या व्हत्ते यांनी प्रचाराच्या रणधुमाळीतही हिंदू संस्कृती आणि गौसेवा यांचा आदर्श घालून दिला आहे. लंपी रोगाने त्रस्त होऊन मृत पावलेल्या एका गौमातेवर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जेसीबीच्या सहाय्याने खड्डा करून अंत्यसंस्कार केले.

​मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २३ नोव्हेंबर रोजी ॲड. स्वप्नील व्हत्ते हे नेहमीप्रमाणे आपल्या नगराध्यक्षपदाच्या प्रचारात व्यस्त होते. त्याच वेळी, धम्मा पोले यांचा त्यांना फोन आला आणि त्यांनी एका गौमातेच्या निधनाची माहिती दिली. ही गौमाता ‘लंपी’ (Lumpy Skin Disease) या रोगाने त्रस्त होती.
​ॲड. व्हत्ते यांनी प्रचाराचे काम बाजूला ठेवून तत्काळ आपल्यासोबतच्या स्वयंसेवकांना अंत्यसंस्कारासाठी सज्ज होण्यास सांगितले. त्यांनी तातडीने घटनास्थळी जेसीबी (JCB) मागवून घेतला. स्वतः जातीने लक्ष घालून, जेसीबीच्या साहाय्याने योग्य खड्डा खोदून, हिंदू संस्कृती आणि परंपरेनुसार त्या गौमातेची अंत्यविधी केली.

​ॲड. स्वप्नील व्हत्ते हे अहमदपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार असले तरी, ते गेल्या अनेक वर्षांपासून गौमातेचे निष्ठावान सेवेकरी म्हणून ओळखले जातात. त्यांची ही कृती ‘धर्मो रक्षति रक्षितः’ या तत्त्वानुसार धर्माचे रक्षण करणाऱ्याला धर्म रक्षण करतो, हे सिद्ध करणारी आहे. प्रचारादरम्यानही त्यांनी सामाजिक आणि धार्मिक जबाबदारीचे भान जपल्याबद्दल अहमदपूर शहरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!