नगर परिषद निवडणूक ;भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ

0
नगर परिषद निवडणूक ;भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ

​पोलीस फ्लॅश न्यूज अहमदपूर( गोविंद काळे ) आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) प्रचाराचा जोरदार शुभारंभ केला आहे. भाजपचे नेते गणेश हाके, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, दिलीपराव देशमुख, भारत चामे, राजकुमार मजगे ,ओम पुणे, तालुका अध्यक्ष प्रताप पाटील, नगराध्यक्षपदाचे उमेदवार स्वप्निल व्हत्ते आणि अशोक काका केंद्रे यांच्यासह अन्य प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा प्रचार शुभारंभ करण्यात आला.
​प्रचार शुभारंभाची सुरुवात ग्रामदैवत हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन नारळ फोडून करण्यात आली. यानंतर भाजपच्या सर्व नेत्यांनी महादेव गल्लीतील महादेव मंदिर, गवळी गल्लीतील श्रीकृष्ण मंदिर आणि बालाजी मंदिर येथे दर्शन घेतले. धार्मिक विधी आटोपल्यानंतर, मान्यवरांनी शहरातील प्रमुख चौकांमधील थोर नेत्यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले.
​यामध्ये क्रांती चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, वीर सावरकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, तसेच गोपीनाथ मुंडे चौक आणि बसवेश्वर चौक येथे शिरसाष्टांग अभिवादन करण्यात आले.
​या भव्य शुभारंभाच्या निमित्ताने भाजपचा नगर परिषद निवडणुकीसाठीचा जाहीरनामा देखील प्रकाशित करण्यात आला. या वेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार स्वप्निल व्हत्ते यांनी निवडणुकीत विजय मिळवून शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. या प्रचार शुभारंभाला नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती, ज्यामुळे भाजपच्या निवडणुकीच्या कामाला उत्साहपूर्ण सुरुवात मिळाली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!