वाढवणा पाटी व्हाट्सअप ग्रुपच उपक्रम, संकटात सापडलेल्या व्यक्तीला तातडीने आर्थिक मदत

0
वाढवणा पाटी व्हाट्सअप ग्रुपच उपक्रम, संकटात सापडलेल्या व्यक्तीला तातडीने आर्थिक मदत

वाढवणा (प्रतिनिधी) येथील वाढवणापाठी व्हाट्सअप ग्रुप च्या वतीने तातडीने निधी जमा केला,
वाढवणा बु (ता.उदगीर ) येथील दोन कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात देन्यात आला.
वाढवणा बु येथील राम यादवराव पुंड हे किडणी या आजाराने त्रस्त होते. या कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने उपचारासाठी पैसे नसल्याची माहिती मिळताच वाढवणापाठी व्हाट्सअप ग्रुप च्या वतीने त्यांना 50000 (पन्नास हजार) रु मदत करन्यात आली.
वाढवणा बु येथील कै रमेश शंकरराव गायकवाड हे कॅन्सर या आजाराने मरण पावले. त्यांच्या कुटुंबातील कर्ता मानुस गेल्याने घरची परीस्थिती हालाकीकीची झाली असल्याने त्यांच्या कुटुंबाला 20500 (विस हाजार पाचशे)रु मदत या व्हाट्सअप ग्रुप च वतीने करन्यात आली.
या वेळी संतोष सोमासे ,थोंटे नागेश, बालाजी बामणे,सोमा पाटील, रितेश राजमाणे, भगवान गोटमुकले,सोनु मठपती,बबन भांगे,व्यंकट मुंडकर, मठपती साई,हारणाळे आक्षय, मारोती भांगे,सचीन बामणे उपस्थित होते.
ग्रुपच्या सदस्यांनी सहकार्य केल्याबद्दल ग्रुपच्या सहकारी सदस्यांचे एडमिन बालाजी बामणे यांनी मनापासुन आभार मानले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!