छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

0
छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

उदगीर (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय राज्यघटनेबाबत जागरुकता, घटनात्मक अधिकार व कर्तव्याबद्दल विद्यार्थांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. २६/११/२००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच या हल्ल्यात मरण पावलेल्या निष्पाप नागरिकांना दोन मिनिट स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे हे होते. यावेळी मंचावर डॉ. विश्वंभर गायकवाड, डॉ. विष्णू पवार, डॉ. हरिदास तिरपुडे, डॉ.अतिष आकडे उपस्थित होते.या प्रसंगी सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक , कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाचे डॉ. संजय कोनाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन रा. से. यो. कार्यक्रमाधिकारी डॉ. विश्वनाथ भालेराव यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!