लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी सर्वांनी मतदान करावे-मा. अरविंद रायबोले

0
लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी सर्वांनी मतदान करावे-मा. अरविंद रायबोले

……………………………………
महात्मा गांधी महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले मत.
…………………………………..
अहमदपूर ( गोविंद काळे ) मतदान हे भारतीय राज्यघटनेने सर्वांना बहाल केलेला मौलिक अधिकार आहे. सर्व नागरिकांनी अत्यंत सजग राहून आपला मतदानाचा अधिकार बजावावा असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी अरविंद रायभोले यांनी केले.
येथील विकास मंडळ संचलित, महात्मा गांधी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मतदान जनजागृती व शिस्तपालन विषयक कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित अहमदपूर येथील पोलीस उपविभागीय अधिकारी मा. अरविंद रायभोले यांनी मतदान जागृती आणि शिस्तपालन विषयक विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करताना वर्तमान काळामध्ये लोक फसवणूकीचे अनेक फंडे वापरत असून सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. तरी युवकांनी यापासून सावध राहणे आवश्यक आहे. त्याबरोबरच महाविद्यालयात वावरताना व आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्वांनी शिस्तीचे पालन करणे ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी अहमदपूरच्या नायब तहसीलदार शुभांगी जवादे यांनीही विद्यार्थ्यांना लोकशाहीमध्ये मतदानाचे अत्यंत महत्त्व असून विद्यार्थ्यांनी याविषयी आपल्या कुटुंबात व समाजामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेबरोबर एक आदर्श नागरिक घडण्यासाठी व भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील अग्नीवीर मध्ये भरती झालेल्या शिवभक्त राजेंद्र, कच्छवे सिद्धेश्वर, ढवळे संविधान, मुंढे शुभम, घुगे चंद्रकांत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर संस्थेचे प्राध्यापक प्रतिनिधी डॉ. आर. एम. कदम, प्रा. हेमंत पाटील, उपप्राचार्य डॉ. जे. पी. कलकर्णी, सिनेट सदस्य डॉ विनोद माने, पर्यवेक्षक प्रा. एस. के. गायकवाड, प्रा. ए. एन. शिंदे, एन. सी. सी. प्रमुख डॉ. ए. एम. शिंदे, ग्रंथालय प्रमुख डॉ. एस. आर. सुळसुळे, तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. डी. गुळवे यांनी केले आभार डॉ. विनोद माने यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!