लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, आता लखपती दीदी योजना प्रभावीपणे राबवा – मुख्यमंत्री फडणवीस

0
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, आता लखपती दीदी योजना प्रभावीपणे राबवा - मुख्यमंत्री फडणवीस

उदगीर (एल.पी.उगिले) जोपर्यंत मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस आहेत. तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही, याउलट या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवण्याची योजना आहे. उदगीर शहरातील हजारो लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवण्याची जबाबदारी आता स्वाती हुडे यांच्यावर आहे. भारतीय जनता पक्ष लोकाभिमुख पक्ष असून विकासासाठी सदैव अग्रेसर आहे. विकासाचा रथ कायम पुढे घेऊन जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष युतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते उदगीर येथील दसरा मैदान, तालुका क्रीडा संकुल येथील मैदानावर आयोजित प्रचार सभेत बोलत होते.
याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री खुबा, माजी मंत्री तथा आ. संजय बनसोडे, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश आप्पा कराड यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर, अर्चनाताई पाटील चाकूरकर, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, दिलीपराव देशमुख, राजेश्वर नीटुरे, रामभाऊ तिरुके, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष उत्तराताई कलबुर्गे, अमोल निडवदे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उदगीर नगर परिषदेच्या महायुतीच्या उमेदवार स्वाती सचिन हुडे, यांच्यासोबतच औसा, रेनापुर, अहमदपूर आणि निलंगा येथील नगर परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या भाजपाच्या उमेदवारांची ही उपस्थिती होती.
प्रास्ताविक भाषणामध्ये संयोजक आ. संजय बनसोडे यांनी मंत्री पदाच्या काळात केलेल्या विविध विकास कामाचे आणि उदगीर शहरासाठी खेचून आणलेल्या निधीची माहिती देऊन आपण केलेली विकास कामे सांगितली.
त्याचाच धागा पकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उदगीरचे आमदार संजय बनसोडे फार हुशार आहेत. उदगीरकरांची मागणी लक्षात घेऊन जिल्हा निर्मितीसाठी आवश्यक असलेली सर्व प्रशासकीय कार्यालये जंगी इमारतीमध्ये थाटली आहेत. जेव्हा केव्हा राज्यामध्ये नवीन जिल्हा निर्मितीचे धोरण जाहीर होईल त्यावेळेस उदगीर अग्रक्रमाने जिल्हा होईल, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय संविधान खूप प्रभावशाली आहे. पूर्वी राजाच्या पोटी जन्माला येणारा राजा बनत होता. आता मतदार आपला राजा स्वतः निवडून देत आहे. उदगीरचे सुज्ञ मतदार विकासाचे गांभीर्य विचारात घेऊन चालू असलेला विकास आणखी गतिमान करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करतील. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

चौकट……
भारतीय जनता पक्षामध्ये मान्यवरांचा जाहीर प्रवेश…

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ॲड. त्र्यंबक नाना भिसे, लातूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी उदगीर येथील सभेत आपल्या समर्थकासह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनीही घर वापसी केली. याप्रसंगीत अनेक कार्यकर्त्यांनीही वेगवेगळ्या पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. ही प्रवेशाची गर्दी पाहून भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य निश्चितच वाढत चालले असल्याचे चर्चिले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!