डॉ. वर्गीस कुरियन जयंती निबंध स्पर्धा संपन्न

0
डॉ. वर्गीस कुरियन जयंती निबंध स्पर्धा संपन्न

उदगीर (एल.पी. उगिले): भारतातील धवल क्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात निबंध स्पर्धा संपन्न झाली. महाराष्ट्र उदयगिरी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच स्कूल कनेक्ट प्रोग्रॅमअंतर्गत वडमुरंबी येथील जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नेकनाळ येथील आदर्श माध्यमिक विद्यालय, बोंबळी येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि वलांडी येथील सौ. अनुसयादेवी सोनटक्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
दुग्धशास्त्र विभागात डॉ. कुरियन यांना अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. के. मस्के होते. प्रास्ताविक डॉ. सुरेश लांडगे यांनी तर आभार प्रा. डॉ. जयराज तोंडारे यांनी मांनले.​ कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. विशाल रंगवाळ व प्रा. सुजाता गायकवाड हेही उपस्थित होते.​

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!