सीमा भागात औराद कृषी विभागातर्फे शेतकरी मार्गदर्शन शिबिर संपन्न ‌

0
सीमा भागात औराद कृषी विभागातर्फे शेतकरी मार्गदर्शन शिबिर संपन्न ‌

उदगीर (एल पी उगिले)
सीमा भागातील बिदर जिल्ह्यामधील औराद तालुका येथील कृषी विभाग व (आत्मा) या विभागातर्फे गंगनबीड येथे एक दिवशीय शेतकरी मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न झाले. गंगनबीड येथे बळीराजा निवासस्थान लहू लक्ष्मणराव वाडीकर यांच्या शेतीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमार पाटील तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ बसवराज बिरादार ( हवामान तंज्ञ संशोधन बिदर) प्रमुख अतिथी कृषी सहाय्यकनिर्देशक.डी.ए.टी.सी. राजकुमार इकेली ,दापका कृषी अधिकारी शिवानंद ,. दापका फलोत्पादन अधिकारी काशिनाथ राठोड, व आत्मा योजनेचे तालुका अधिकारी पांडुरंग पाटील, नवनाथ तपशिळे‌ कृषी सहायक तांत्रिक व्यवस्थापक प्रमुख अतिथी उपस्थित होते. प्रस्ताविक भाषणात पांडुरंग पाटील म्हणाले की, शेतकरी आपल्या शेतात उत्पन्न वाढवण्यासाठी माती, पाणी परीक्षण करून घ्यावे.जमीनीचा कोणता घटक मातीत आहे हे तपासावे. यामुळे जमीनीची सुपीकता टिकून राहते. कमीत कमी खर्चात उत्पादन जास्त मिळवता येते असे म्हणाले. राजकूमार इकेली शेती विषयक बोलताना संयुक्त शेती करण्यातचे आवाहन केले.पशू धन, फलोत्पादन,सरकारी, कृषी पिके, एक पिके न घेता वेगवेगळे प्रयोगीक पिक उत्पादन घेतले पाहिजे.पशुधनातून शेतकऱ्याला मोठा हातभार लागतो. निसर्गाच्या लहरीपणावर आळा घालण्याचं काम शेती करते. डॉ बसवराज बिरादार आपल्या मार्गदर्शनात फळबाग लागवड व उत्पादन फळ यांचे महत्त्व, शुद्ध हवामान तंज्ञ संशोधन, वातावरणात घटक ऑक्सीजन, काॅर्बन, नायट्रोजन इत्यादीचे महत्व पटवून दिले. हवामान समतोल राखण्यासाठी देशातून व परदेशातून फळ बागधारकाना निधी दिला जातो. हवामान समतोल, एकदा लावलेला झाडं उत्पादन दिर्घ काळ देते. हे सांगून विविध उदाहरणे देऊन हवामानाचे महत्व पटवून दिले. काशिनाथ राठोड यांनी आपणास चार एकर जमीन असेल तर एक एकर तरकारी करावे, पाणी नसेल तर शेततळे , ठिबक सिंचन आमच्या विभागातून करून घ्यावे.अशी सविस्तर माहिती दिली. अंकुश वाडीकर बोलताना म्हणली की, फळबाग, तरकारी यामध्ये सातत्य व निष्ठेने काम ठेवल्यास शेतकरी कधीही मागे येणार नाही. शेतकऱ्यांनी व्यावसायीक दृष्टीकोनातून ‌अंगी बाळगून शेती केली पाहिजे. असे सांगुन दापका परीसरातून आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे बिंदास झाले त्यांचा आभार मानले. त्यावेळी शेतकरी वर्ग राजकूमार शेळके, शुभम पाटील, जगदिश पाटील, नागनाथ स्वामी, रोहीदास पाटील,बाबुराव बिरादार, अंकुश पाटील, तूकाराम बिरादार, राजकुमार बिरादार, लक्ष्मणराव वाडीकर,किशन पाटील, अविनाश पाटील, धनराज वाडीकर, महेश वाडीकर,अशोक वाडीकर. राजकूमार वाडीकर, गोविंद वाडीकर, दिगंबर वाडीकर,राम म्हैत्रै, बालाजी म्हैत्रै, रघुनाथ राठोड, लक्ष्मण म्हैत्रै , किसान वाडीकर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जाधव यांनी केले. मोठ्या उत्साहात शेतकरी मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!