छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा
उदगीर (प्रतिनिधी)
येथील छञपती शिवाजीराजे महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर.एम. मांजरे होते. यावेळी डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .
यावेळी प्राचार्य डॉ.मांजरे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. अस्पृश्यता, जातिभेद, धर्मव्यवस्था या विरोधी यांनी कडाडून प्रहार केला. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांचा लोकशाही व्यवस्थेत पुरस्कार केला असे विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार जयंती समिती प्रमुख तथा मराठी विभागप्रमुख डॉ.सुरेश शिंदे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला प्रबंधक बी. के. पाटील, व्ही. डी. गुरनाळे, आर. एम. लाडके, डॉ.विष्णू पवार,
डॉ.एच.ए.तिरपुडे, राम गिरी, प्राध्यापक वृंद, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
